मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी ladkibahin.maharashtra.gov.in महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना दिड हजार रुपये (१५००/-) प्रती महिन्याला मिळणार आहेत. राज्य शासनाने हि योजना राज्यातील महिलांकरिता सुरु केली असून १ जुलै २०२४ पासून योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणे सुरु आहेत. राज्यातील महिलांना आधार देणारी हि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना फायदेशीर ठरणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे? (What is Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्य शासनाने २०२४ मध्ये सुरु केली असून या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलेला दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील २१ ते ६५ वर्ष या वयोगटातील विवाहित महिला, विधवा महिला, परित्यक्त्या आणि निराधार महिला घटस्फोटीत महिला इ. महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच त्या कुटुंबातील १ (एका) मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी लाभार्थी महिलांनी योजनेच्या अधिकृत पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये हे त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये  DBT मार्फत मिळणार आहेत.

लाडकी बहिण योजना केवायसी बद्दल माहिती

लाडकी बहिण योजनेची केवायसी करताना काळजी घ्यावी कारण आपण शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती केवायसी करत आहात का? हे चेक करावे. शासनाने केवायसी करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. यामुळे लाभार्थीने फक्त शासनाच्या अधिकृत पोर्टल वरतीच आपली केवायसी करून घ्यावी.

माझी लाडकी बहिण योजना GR (शासन निर्णय)

शासन राज्यातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबविते, राज्यातील महिलांसाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना सुरु केली आहे. दि. २८ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. या योजनेमध्ये विविध बदल करण्यात आलेले असून अनेक अटी व शर्ती कमी करण्यात आलेल्या आहेत. लाभार्थी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीद्वारे आपला अर्ज करू शकतात.

Ladki Bahin Yojana Highlights

योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
राज्य
महाराष्ट्र
योजना सुरु कोणी केली
महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची अधिकृत वेबसाईट
लाडकी बहिण योजना अँप
नारीशक्ती दूत (Narishakti Doot App)
अर्ज सुरु दिनांक
1 जुलै 2024
लाभार्थी वर्ग
महाराष्ट्र राज्यातील महिला
मिळणारा लाभ
१५०० रु दर महिना
योजनेचे उद्दिष्ट
राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनविणे, रोजगार निर्मितीस चालना देणे, आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा.
अर्ज कुठे करावा
ladakibahin.maharashtra.gov.in पोर्टल द्वारे किंवा Narishakti Doot App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज

शासनाने अर्ज करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीद्वारे लाभार्थी अर्ज करू शकतात, ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसल्यास त्या महिला ऑफलाईन अर्ज करू शकतात, ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांच्याकडे करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने नारीशक्ती दूत हे अँप व ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र याठिकाणी जावून लाभार्थी महिला आपला अर्ज ऑनलाईन भरू शकतात.

लाडकी बहिण योजना ladakibahin.maharashtra.gov.in पोर्टल बद्दल माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज करण्यासाठी www.ladakibahin.maharashtra.gov.in हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहेत, अनेक लाभार्थी अर्ज करण्यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टल वरती अर्ज करण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्जदारांनी शासनाच्या अधिकृत पोर्टल वरती आपला अर्ज भरावा. किंवा नारीशक्ती दूत या अँप द्वारे सुद्धा अर्ज करता येणार आहे. पोर्टल वरती अर्ज करणाऱ्या नागरिकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत पोर्टल वरतीच अर्ज करावा.

Required Documents (अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे)

अर्ज करण्यासाठी लाभार्थीकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक (बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे)
  • शिधापत्रिका (रेशन कार्ड)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उत्पन्न दाखला (केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही)
  • अधिवास प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र नसेल तर १५ वर्षापूर्वीचे १) रेशन कार्ड, २) मतदार ओळखपत्र, ३) जन्म दाखला, 4) शाळा सोडल्याचा दाखला, यापैकी कोणतेही एक)
  • मोबाईल नंबर
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हमीपत्र

लाडकी बहिण योजना अर्जाबद्दल सविस्तर माहिती

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने अर्ज भरणें आवश्यक आहे, अर्ज भरल्यानंतर अर्जाची छाननी/तपासणी केली जाईल, अर्जामध्ये काही चुकीची माहिती आढळलल्यास आपला अर्ज रिजेक्ट किंवा Disapproevd केला जाऊ शकतो. यामुळे लाभार्थीने अर्ज भरताना अर्जामधील माहिती आपल्या कागदपत्राप्रमाणे भरावी. अर्जासोबत कागदपत्रे अपलोड करताना सर्व कागदपत्रे स्पष्ट अपलोड करावी. काही कारणामुळे आपला अर्ज नामंजूर झाल्यास लाभार्थीला एसएमएस द्वारे कळविले जाते आहे. एसएमएस आल्यानंतर लाभार्थीने आपण ज्या ठिकाणी अर्ज भरला त्याठिकाणी जावून अर्जाचे स्टेटस स्थिती चेक करावी, व आपला अर्ज कोणत्या कारणामुळे नामंजूर झाला हे चेक करावे. अर्ज Reject किंवा Disapporved झाल्यानंतर लाभार्थीला पुन्हा अर्जाध्ये बदल कारणासाठी Edit हे बटन मिळणार आहे. त्यावरती क्लिक करून लाभार्थीला अर्जामध्ये बदल करता येणार आहे. परंतु हा पर्याय लाभार्थीला एकदाच मिळणार आहे. यामुळे पुन्हा बदल करताना लाभार्थीने काळजी घ्यावी.

Ladki Bahin Yojana Apply Online Process

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पोर्टल वरून अर्ज करण्यासाठी आपण खालील स्टेप फॉलो करून आपण ladakibahin.maharashtra.gov.in पोर्टल वरून अर्ज करू शकता.

  1. सर्वप्रथम मोबाईल मध्ये शासनाचे ladakibahin.maharashtra.gov.in हे पोर्टल ओपन करा.
  2. पोर्टल वरती अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी अर्जदार लॉगइन या पर्यायावर क्लिक करावे.
  3. नोंदणी करण्यासाठी Doesn`t hav account समोरील Create Account वरती क्लिक करा.
  4. आपल्या समोर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये आपले आधार प्रमाणे नाव, मोबाईल नंबर इ. वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
  5. पोर्टल वरती लॉगइन करण्यासाठी एक पासवर्ड (प्रत्येक वेळी लॉगइन करताना लागणार) टाकावा लागणार आहे.
  6. जिल्हा, गाव, तालुका इ. माहिती भरावी.
  7. Authorized Person मध्ये आपण कोण आहात हे निवडायचे आहे. आपण सामान्य महिला असल्यास General Women पर्याय निवडू शकता.
  8. Captcha कोड भरून आपण sign up/रजिस्ट्रेशन करू शकता.
  9. पुन्हा पोर्टल ओपन करा व अर्जदार लॉगइन पर्यायावर क्लिक करून नोंदणी करतेवेळी दिलेला मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करावे.
  10. Application of Mukhyamantri-Majhi Ladki Bahin Yojana या पर्याय वरती क्लिक करावे त्यानंतर आपल्याला आधार क्रमांक टाकावा लागेल.
  11. आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून व्हेरीफाय करावे. त्यानंतर आपल्या समोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म ओपन होईल.
  12. संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी..
  13. कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री करावी यानंतर आपण अर्ज Submit करा.
  14. अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसामध्ये अर्जाची तपासणी केली जाईल.
  15. अर्जामधील सर्वमाहिती व कागदपत्रे बरोबर असल्यास आपला अर्ज मंजूर होईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्रता Ladki Bahin Yojana Eligibility Criteria

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  •  वय वर्षे २१ ते ६५ वयोगटातील महिला योजनेसाठी पात्र असतील.
  • राज्यातील विवाहित, विधवा, परित्यक्त्या आणि निराधार महिला, घटस्फोटीत महिला
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २ लाख ५० हजार पेक्षा कमी असावे.

लाडकी बहिण योजना अर्ज करण्यासाठी मुदत

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासनाने ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अंतिम मुदत  देण्यात आली होती परंतु हि ladki bahin yojana last date मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु यामध्ये पुन्हा मुदतवाढ करण्यात आली असून १५ आँक्टोंबर २०२४ पर्यंत लाभार्थी अर्ज करू शकतात, परंतु लाभार्थींना अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज करावा लागेल.

Scroll to Top