महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली, योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जातात. शासनाने पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले होते, लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली परंतु केवायसी करताना अनेक लाभार्थी महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला, यामुळे अनेक लाभार्थी महिलांचे १५०० रुपये मिळणे बंद झाले होते. परंतु आता या महिलांना काळजी करण्याची गरज नाही.
ज्या महिलांनी केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला आहे, अशा महिलांसाठी शासनाकडून केवायसी करण्यासाठीचा पर्याय पुन्हा सुरु करण्यात आलेला आहे यामुळे अशा लाभार्थी महिलांना पुन्हा केवायसी करता येणार आहे.
लाडकी बहिण योजना KYC दुरुस्त कशी करावी?
जर केवायसी करताना काही चूक झाली असेल किंवा चुकीचा पर्याय निवडला असेल तर अशा महिलांना पुन्हा केवायसी करता येणार आहे. पुन्हा केवायसी करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- लाडकी बहिण योजनेची अधिकृत वेबसाईट उघडा.
- लाडकी बहिण योजना अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
- वेबसाईट उघडल्यानंतर वरील फोटो प्रमाणे तुम्हाला पर्याय दिसेल.
- ही eKYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून eKYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. या पर्यायावर क्लिक करा.
- आपल्या समोर ई-केवायसी पेज उघडेल.
- सर्व प्रथम लाभार्थीचा आधार क्रमांक विचारला जाईल. आपला आधार क्रमांक दिलेल्या चौकोनात भरा.
- मी सहमत आहे पर्याय निवडून ओटीपी पाठवा वरती क्लिक करा.
- आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती सहा अंकी ओटीपी येईल तो ओटीपी टाका. आणि सबमिट करा बटन वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे पर्याय दिसतील.
e-KYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना.
A) माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग /उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत 🔿 आहे 🔿 नाही
B) माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवा निवृत्ती नंतर निवृत्तीवेतन घेत 🔿 आहे 🔿 नाही
यामधील बरोबर पर्याय निवडावा.
उपरोक्त अ.क्र. A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास… समोरील चौकोनात क्लिक करा.
आणि सबमिट करा. यानंतर आपली केवायसी सबमिट होईल.