लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) हि महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आर्थिक योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देऊन त्यांचे सशक्तीकरण करणे. पण अनेकांना प्रश्न पडतो कि लाडकी बहिण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात जमा होतात? चला तर याची आपण सविस्तर माहिती पाहूया.
लाडकी बहिण योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील सर्व पात्र महिलांना १५०० रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते हि रक्कम शासनाच्या DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे दिली जाते, म्हणजेच यामध्ये डायरेक्ट लाभार्थीच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात.
लाडकी बहिण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात जमा होतात?
माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतात, म्हणजेच ज्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे त्याच खात्यात पैसे जमा होतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, माझे आधार कार्ड तर सर्व बँक खात्याला लिंक आहे, मग पैसे कसे जमा होत नाहीत? तर NPCI लिंक हे फक्त तुमच्या एकाच बँक खात्याला लिंक होते. म्हणजेच NPCI आधार लिंक हे जर तुमचे 4 बँक खाते असतील तर त्यामधील एकाच खात्याला NPCI आधार लिंक असते.
जर आपले आधार कार्ड कोणत्याच खात्याला NPCI लिंक नसेल तर शासनाच्या DBT मार्फत देण्यात येणाऱ्या लाभाची आर्थिक मदत हि तुम्हाला मिळू शकत नाही. यामुळे आधार कार्ड NPCI लिंक असणे गरजेचे आहे. आता आपले आधार कार्ड कोणत्या बँकमध्ये लिंक आहे? हे आपण मोबाईल वरून चेक करू शकता.
अनेक लाभार्थींची शंका आहे कि आम्ही जे बँक खाते फॉर्म भरताना दिले त्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. लाडकी बहिण योजनेचे पैसे हे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा होतात यामुळे फॉर्म भरताना दिलेले खाते जर आधार कार्ड नंबरशी जोडलेले नसेल तर त्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत, परंतु आपला फॉर्म जर approve झाला असेल तर लाभार्थीचे पैसे हे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतील.
आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर आजच आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे, तरच योजनेचा लाभ त्या लाभार्थीला मिळू शकतो. आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे पाहण्यासाठी येथे सविस्तर माहिती दिलेली आहे.
आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे? आत्ताच चेक करा
- सर्व प्रथम आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे चेक करण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाईट वरील My Aadhaar पर्याय निवडावा लागेल.
- डायरेक्ट वेबसाईट लिंक : https://myaadhaar.uidai.gov.in/en_IN
- वेबसाईट मोबाईल मध्ये लिंक ओपन करा त्यानंतर तुम्हाला Login हा पर्याय पाहायला मिळेल.
- त्यानंतर आपल्या समोर नवीन पेज उघडेल, त्याठिकाणी आपला आधार क्रमांक टाकून घ्यावा.
- आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकून Login With OTP वरती क्लिक करा.
- आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाकून Login बटन वरती क्लिक करा.
- लॉगीन झाल्यानंतर Address Update, Bank Seeding Status असे अनेक पर्याय त्याठिकाणी पाहायला मिळतील.
- Bank Seeding Status वरती क्लिक करा, त्यानंतर आपले आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे त्या बँकेचे नाव त्याठिकाणी दाखवले जाईल.
- आणि ते Active आहे कि InActive हे सुद्धा दाखवले.
- जर आपले खाते Active असेल तरच बँक खात्यात आपले लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होतील.
परंतु लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी लाभार्थीचा अर्ज मंजूर(Approve) झालेला असावा. तसेच लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असावा. तरच लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारे आपण लाडकी बहिण योजनेचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा होत आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

