Ladki Bahin Yojana Status Check

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यातील महिलांना मोठा फायदा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जातात. राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे स्टेटस कसे चेक करायचे याबद्दल सविस्तर माहिती या लेखात माहिती दिलेली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना स्टेटस

माझी लाडकी बहिण योजनेसाठी राज्यातील अनेक महिलांनी अर्ज भरलेले भरलेले आहेत. अर्ज भरल्यानंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर (Approved) झालेले आहेत अशा पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळलेले आहेत. ज्या महिलांचे आधार बँक खात्यामध्ये लिंक नाही अशा महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नाहीत. अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत याचे स्टेटस कसे चेक करायचे, याचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. म्हणजेच आता लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही याचे स्टेटस पाहता येणार आहे हे स्टेटस कसे पहायचे? पहा.

लाडकी बहिण योजनेचे स्टेटस ज्या ठिकाणी लाभार्थीने अर्ज भरला आहे त्याठिकाणी लाभार्थींना अर्जाचे स्टेटस पाहता येणार आहे, स्टेटस मध्ये लाभार्थीना आपण पात्र आहोत किंवा नाही याचे स्टेटस पाहायला मिळेल. तसेच बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले किंवा नाही याचे स्टेटस सुद्धा पाहायला मिळणार आहे. पैसे किती जमा झाले व कधी झाले, कोणत्या बँकेत जमा झाले याबद्दल संपूर्ण स्टेटस मध्ये पाहता येणार आहे.

लाडकी बहिण योजनेचे स्टेटस कसे पहायचे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे स्टेटस आपण खालील स्टेपनुसार पाहू शकता.

  • आपण वेबसाईट वरती अर्ज केलेला असेल तर तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वेबसाईट वरती लॉगइन करावे लागेल.
  • साईट वरती लॉगइन केल्यानंतर Menu मध्ये Application Made Earlier या पर्याय वरती क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमचा अर्ज त्याठिकाणी पाहायला मिळेल. आपल्या नावाच्या समोर अर्जाचा क्रमांक, अर्जदाराचा फोटो, अर्जाचे स्टेटस (Approved/Reject)/ Sanjay Gandhi आणि Action हे पर्याय पाहायला मिळतील.
  • यामधील Action या पर्याय मध्ये खाली दाखवल्या प्रमाणे पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक करावे.
ladki bahin yojana status check marathi
  • वरील पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाचे स्टेटस पाहायला मिळेल.
  • खालील प्रमाणे तुम्हाला संपूर्ण स्टेटस पहायला मिळेल.
ladki bahin yojana marathi status
Scroll to Top