लाडकी बहिण योजनेचे महिलांच्या खात्यात जमा झाले ३००० रुपये ladki bahin yojana installment release

ladki bahin yojana

ladki bahin yojana installment release : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा (जुलै व ऑगस्ट) पहिला व दुसरा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात पाठविला आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दिनांक १ जुलै २०२४ पासुन ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाले होते, राज्यातील अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज मंजूर केलेले आहेत. ज्या महिलांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्यांना एसएमएस (SMS) द्वारे कळविले जात आहे.

ladki bahin yojana installment release

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana अर्ज केल्यानंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अशा महिलांच्या खात्यात शासनाने जुलै आणि ऑगस्ट (1500+1500) या दोन महिन्याचे ३००० रुपये पाठविले आहेत. लाभार्थी महिलेच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठविण्यात आले आहेत. ज्या लाभार्थीचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही अशा महिलांचे पैसे जमा झालेले नसतील, अशा महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे, आधार कार्ड लिंक करण्यासाठी DBT (NPCI) फॉर्म व सोबत आधार कार्ड झेरॉक्स जोडून संबधित बँकेत जमा करणे आवश्यक आहे.

ज्या महिलांचे अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास (नावात बदल, कागदपत्रे चुकीची अपलोड, कागदपत्रे स्पष्ट न दिसणे, इतर) त्यांनी संबधित माहिती पुन्हा भरून फॉर्म सबमिट करावा. अर्जामध्ये बदल करण्यासाठी EDIT ऑप्शन दिलेला आहे, परंतु लाभार्थींना अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे. यामुळे अर्जामध्ये काही बदल करताना सर्व माहिती व कागदपत्रे जवळ असल्याची खात्री करावी. नंतरच EDIT पर्यायवरती क्लिक करून अर्जामध्ये बदल करावा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नसतील तर काय करावे?

  • ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे ३००० रुपये मिळाले नसतील तर अशा महिलांनी सर्व प्रथम आपला अर्ज Approved (मंजूर) झाला आहे का हे चेक करणे ladki bahin yojana application status आवश्यक आहे. अर्ज Approved झाला आहे का? हे चेक करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी अर्ज भरला त्याठिकाणी अर्जाचे स्टेटस चेक करता येईल.
  • उदा. ऑनलाईन सेंटर मध्ये जाऊन अर्ज भरला असेल तर त्याठिकाणी अर्जाचे स्टेटस चेक करता येणार आहे. मोबाईल App मधून अर्ज भरला असेल तर मोबाईल App मध्ये अर्जाचे स्टेटस चेक करता येईल. वेबसाईट पोर्टल वरती अर्ज भरला असेल वेबसाईट वरती अर्जाचे स्टेटस चे करता येणार आहे.
  • ३००० रुपये मिळाले नसतील तर अर्जाचे स्टेटस चेक करावे, अर्ज Approved होऊन सुद्धा ३००० रुपये मिळाले नसतील तर आपण आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का हे चेक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेत फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.

16 thoughts on “लाडकी बहिण योजनेचे महिलांच्या खात्यात जमा झाले ३००० रुपये ladki bahin yojana installment release”

    1. फॉर्म Approved झाला आहे का चेक करावे, झाला असेल तर आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे का चेक करावे.

  1. Farjana Alim Shaikh

    Form submit karun 2 week jhale pan attaparyant pending madhech ahe approved jhalel nahi kay problem ahe. Ani Kadhi paise zama honar.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top